श्रृतकीर्ती जोशी,
कॉर्पोरेट कम्युनिकेशन - कोहिनूर ग्रुप

23 एप्रिल 2016 हा जगप्रसिध्द नाटककार विल्यम शेक्सपिअरचा 400 वा स्मृतिदिन होता. शेक्सपिअरने एकूण 37 नाटके लिहिली. त्यापैकी 14 सुखात्मिका, 13 शोकांतिका आहेत. याशिवाय इंग्लडच्या राजांच्या आयुष्यांवरील 11 ऐतिहासिक नाटके आहेत. याशिवाय 154 सोनेटमधून अर्थात सुनीतांमधून आपल्यांला दिसते. शेक्सपिअरच्या नाटकाची मोहिनी सलग 425 वर्षे कशी टिकून राहते. हा आपल्याला सहज पडू शकणारा प्रश्न आहे.

शेक्सपिअरच्या नाटकाची जगातील खूप भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. त्याच्या नाटकांवर आधारीत अनेक चित्रपट निर्माण झाले आहेत. विंदा करंदीकर यांचे राजालियर, वि.वा. शिरवाडकरांचे नटसम्राट, राजीव नाईक यांचे ऐन वसंतात अर्ध्या रात्री, अरूण नाईक यांचे ऑथेल्लो, दिलीप जगताप यांचे ज्युलियस सीझर अशा अनेक संहिता आपण मराठीत बघितल्या आहेत. याशिवाय हिंदी चित्रसृष्टीत विशाल भारद्वाज यांचा ओंकारा, रामलीला हा भन्साळींचा चित्रपट आपण शेक्सपिअरच्या साहित्यांवर आधारीत बघितला आहे.

विल्यम शेक्सपिअरचे निधन होऊन आजबरोबर चारशे वर्षे झाली आहेत. शेक्सपिअर केवळ 52 वर्षे जगला पण मृत्युनंतर शेक्सपिअरचे साहित्य जगांत कोठे पोहोचले नाही असे आढळून येत नाही. त्याची नाटके, सुनीते यांचा

अनुवाद झाला नाही अशी एकही भाषा नसेल. जगभर त्याच्या नाटकाचे प्रयोग आजही होताना दिसतात. शेक्सपिअरच्या साहित्याची भूरळ सर्वच नाटककार, दिग्दर्शक आणि नटांना होताना दिसते. त्याची बरोबरी फक्त बायबलच करू शकते.

‘रोमिओ अॅेन्ड ज्युलिएट‘ ही उत्कट प्रेमाची शोकांतिका शेक्सपिअरच्या सर्वात लोकप्रिय नाटकांपैकी एक आहे. त्यांतील नायक आणि नायिकेचे आत्मसमर्पण चटका लावणारे आहे. हेम्लेट हे शेक्सपिअरचे सर्वात गूढ,

वादग्रस्त परंतु लोकप्रिय नाटक या नाटकांत नायकाच्या व्यक्तीमत्वाचे मानसशास्त्रीय विश्लेषण जेवढे जागतिक स्तरावर झालेले आहे, तेवढे जागतिक साहित्यांतील दुसर्या कोणत्याही व्यक्तीरेखेबद्दल झालेले नाही.

शेक्सपिअरने 154 सुनिते लिहिली. तो कवी म्हणून खूप लोकप्रिय झाला. शेक्सपिअरची सुनिते हा काव्यप्रकारांतील ‘सर्वेत्कृष्ट कविता‘ प्रकार म्हणून ओळखला जातो. या काव्यांमध्ये त्याने आपल्या मित्राला उद्देशून त्याची स्तुतीपर अशी ही काव्य रचली. या काव्यप्रकारांत आपल्या प्रिय मित्राव्यतीरिक्त Dark Lady साठी सुध्दा उद्देशून त्यांनी सुनिते लिहीली आहेत.

शेक्सपिअर वयाच्या पन्नाशीतच 23 एप्रिल 1616 रोजी अल्प आजारांतच निधन पांवला. जवळजवळ दोन दशके नट, नाटककार, कवी, रसिक, नाटक कंपनीचा भागीदार असा शेक्सपिअर प्रेक्षकांनी त्या काळांत बघितला. त्याची फारच थोडी नाटके त्याच्या हयातीत प्रसिध्द झाली. त्याच्या निधनानंतर त्याच्या मित्रांनी जवळजवळ सात वर्षानंतर त्याची सर्व नाटके साहित्यरूपात प्रकाशित करण्यात आली. त्यांनी प्रकाशित केली नसती तर कदाचित एवढे महान साहित्य जगासमोर आलेच नसते आणि आज 400 वर्षानंतरसुध्दा शेक्सपिअरचे गारूड जनमानसावर राहिले नसते. म्हणूनच शेक्सपिअर हा कालातीत आहे. हे सत्य नाकारता येत नाही. या प्रज्ञावंताला विनम्र अभिवादन करत असताना त्याने आपल्या मित्रालाच उद्देशून काढलेले उद्गार अगदी तंतोतंत खरे वाटतात.

"So long as men can breathe and eyes can see
So long lives this and this gives life thee"